European Roller sighting in Chowkul Sindhudurg
esakal
बांदा (जि. सिंधुदुर्ग) : पावसाळा ओसरत असतानाच पश्चिम घाटात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची चाहूल लागली (Sindhudurg Nature Update) असून, यावर्षीचा पहिला स्थलांतरित पाहुणा म्हणून ‘युरोपियन रोलर’चे चौकुळ परिसरात दर्शन झाले आहे. पक्षीनिरीक्षक व निसर्ग अभ्यासक प्रवीण सातोसकर यांनी आज या देखण्या पक्ष्याचे निरीक्षण केले.