regional development.
sakal
कोकण
Sindhudurg Development : डांबरीकरणाकडून काँक्रिटीकरणाकडे; नवे रस्ते पर्व, ऊन, वारा, पावसात कितपत तग धरणार?
Concrete Road Revolution : पायवाटांपासून मातीच्या रस्त्यांपर्यंत, खडीकरणापासून डांबरीकरणापर्यंत आणि आता थेट काँक्रिटीकरणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रस्तेविकासाचा हा प्रवास खऱ्या अर्थाने विकासाचा आलेख ठरतो आहे. तब्बल २३९ किलोमीटर लांबीचे प्रमुख महामार्ग काँक्रिटचे होत आहे.
कधीकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या पायवाटांचे मातीच्या रस्त्यात रुपांतर झाले. कालातंराने त्याच मातीच्या रस्त्यांची जागा खडीकरणाने घेतली. पुढे खडीकरण, रुंदीकरण करीत डाबरीकरण झाले. मात्र, आता सिंधुदुर्गात डांबरीकरणाची जागा काँक्रिटीकरण घेत आहे. मुंबई-गोवा महामार्गानंतर आता जिल्ह्यातील काही महामार्गांचे काँक्रिटीकरण सुरू झाले आहे.

