सिंधुदुर्गात तिसरी लाट उतरणीला; सात दिवसांत १२० बाधित

सिंधुदुर्गात आज ३१ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील १५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेले, तर ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
Coronavirus
CoronavirusSakal
Summary

सिंधुदुर्गात आज ३१ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील १५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेले, तर ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ओरोस - सिंधुदुर्गात (Sindhudurg) आज ३१ कोरोना रुग्ण (Corona Patients) मिळाले आहेत. यातील १५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेले, तर ४६ रुग्ण कोरोनामुक्त (Coronafree) झाले. एकाही रुग्णाचे निधन झालेले नाही. जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) ओसरल्याचे चित्र आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात १२० रुग्ण मिळाले असून, पाच रुग्णांचे निधन (Death) झाले. केवळ १८४६ नमुने तपासण्यात आले आहेत.

३१ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्यात ५३ हजार २५२ एकूण बाधित रुग्ण होते. १४६४ मृत्यू होते, तर ६ लाख २ हजार एवढे एकूण नमुने चाचणी संख्या होती. आज बाधित संख्या ५७ हजार २५३ झाली. मृत्यू संख्या १५१९ झाली. चाचणी संख्या ६ लाख २५ हजार ४९३ झाली. जानेवारी महिन्यात २४ तासांत बाधित मिळणाऱ्या रुग्णांची संख्या २०० च्या वर गेली होती. मृत्यू संख्यासुद्धा दिवसाला दोन-तीन होती. बाधित दर ३० टक्के गेला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांत हा दर खूपच खाली आला असून, बाधित संख्या २० च्या घरात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७ हजार २५३ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील ५५ हजार ४१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १५१९ रुग्णांचे निधन झाले. ३१५ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील १२ रुग्ण शासननिर्मित कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या शासकीय संस्थेत उपचार घेत आहेत. उर्वरित ३०३ रुग्ण होम आयसोलेटेड आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Coronavirus
महानिर्मिती कंपनीत होणार २६२० पदावर कामगार भरती

जिल्ह्यात आज मिळालेले रुग्ण (कंसात एकूण रुग्ण) देवगड १ (६३९७), दोडामार्ग २ (३२०५), कणकवली १ (१०६००), कुडाळ १७ (११८३५), मालवण १ (८२२८), सावंतवाडी ८ (८४२१), वैभववाडी ० (२५५९), वेंगुर्ले १ (५०९२), जिल्ह्याबाहेरील ० (३१७). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) देवगड २४ (१८४), दोडामार्ग ११ (४६), कणकवली २९ (३१७), कुडाळ ७८ (२५३), मालवण ६१ (२९७), सावंतवाडी ५० (२१४), वैभववाडी १० (८३), वेंगुर्ला ४७ (११४) जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५ (९).

३१५ रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी ५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये ३ लाख ३४ हजार ७८१ नमुने तपासण्यात आले. यातील ४१ हजार ९२ नमुने पॉझिटिव्ह आले. आज नव्याने १७२ नमुने घेण्यात आले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण २ लाख ९० हजार ७१२ नमुने तपासले. पैकी १६ हजार ३९१ नमुने पॉझिटिव्ह आले. आज नवीन १४८ नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ४९३ नमुने तपासण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com