esakal
Sindhudurg DCC Bank Recruitment 2026
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ही भरती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)मार्फत राबविण्यात येणार (Sindhudurg DCC Bank 67 Clerk Recruitment 2026) आहे. गुरुवारी (ता. ३) दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार असून, १७ सप्टेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. शासनाने नव्याने निश्चित केलेल्या निकषांनुसार एकूण पदांपैकी ७० टक्के पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.