esakal | सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे ५१ जणांची प्रकृती चिंताजनक

बोलून बातमी शोधा

In Sindhudurg district, 51 people are in critical condition kokan Marathi news

जिल्ह्यात सोमवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला तर नवे १७४ रुग्ण मिळाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे ५१ जणांची प्रकृती चिंताजनक

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ सुरूच आहे. सोमवारी नवीन 174 रुग्ण मिळाले. दोघांचा मृत्यू झाला. त्यात मालवण येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. वैभववाडी येथील 67 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. 

सक्रिय रुग्णसंख्या एक हजार 290 झाली. यातील तब्बल 51 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पैकी आठजण व्हेंटिलेटरवर आहेत. याचवेळी 55 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्याची एकूण बाधित संख्या गतिमान पद्धतीने 10 हजारांच्या दिशेने जाताना दिसत आहे. सध्या एकूण बाधित संख्या 8 हजार 358 झाली आहे. पैकी 6 हजार 864 कोरोनामुक्त आहेत. मृत्यू संख्या 198 झाली आहे. परिणामी एक हजार 290 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यात 1290 सक्रिय रुग्ण असून, पैकी 43 रुग्ण ऑक्‍सिजनवर तर आठ व्हेंटीलेटरवर आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 50 हजार 840 नमुने तपासले. यातील 5 हजार 796 नमुने पॉझिटिव्ह आहेत. आज 1261 नमुने घेतले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण 31 हजार 983 नमुने तपासले. पैकी दोन हजार 748 नमुने पॉझिटिव्ह आहेत. नवीन 57 नमुने घेतले. आतापर्यंत एकूण 82 हजार 823 नमुने तपासण्यात आले. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यूसंख्या
देवगड 783 (15), दोडामार्ग 424 (5), कणकवली 2360 (50), कुडाळ 1802 (36), मालवण 828 (22), सावंतवाडी 1095 (44), वैभववाडी 346 (15), वेंगुर्ले 672 (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 48 (1).

तालुकानिहाय सक्रिय रुग्ण 
देवगड - 249, दोडामार्ग - 49, कणकवली - 206, कुडाळ - 257, मालवण - 160, सावंतवाडी - 140, वैभववाडी - 123, वेंगुर्ले- 90 व जिल्ह्याबाहेरील 16.

संपादन : विजय वेदपाठक