esakal | त्या महिलेच्या कुटुंबातील सहाजण क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg district 6 persons from that family are quarantine

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एकूण 964 व्यक्ती क्वारंटाईन असून यातील 647 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. 317 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

त्या महिलेच्या कुटुंबातील सहाजण क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्‍यातील वाडा येथील बाधित महिलेच्या संपर्कात एकूण 36 व्यक्ती आल्या आहेत. या सर्व व्यक्तींची माहिती हाती आली असून 11 व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कात आहेत. यातील दोन व्यक्तींच्या घशाचे स्त्राव कोरोना तपासणीसाठी पाठविले आहेत. उर्वरित नऊजणांचे नमुने घेण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. 

कोरोनाबाधित महिलेच्या 25 व्यक्ती संपर्कात आल्या आहेत. अतिजोखमीच्या 11 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. त्यात तिच्या कुटुंबातील सहाजणांचा समावेश आहे. कमी जोखमीच्या 25 व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे. ही महिला 51 वर्षीय असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. 
सध्या जिल्ह्यात एकूण 964 व्यक्ती क्वारंटाईन असून यातील 647 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. 317 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 819 नमुने तपासणीसाठी पाठविले. आज 17 नमुने नव्याने पाठविण्यात आले. 813 तपासणी अहवाल आले असून पाच अहवाल पॉझिटिव्ह होते. उर्वरित 808 निगेटिव्ह होते. सहा अहवाल बाकी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात सध्या 63 रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणेने मंगळवारी सहा हजार 58 व्यक्तींची तपासणी केली आहे. पाच बाधितपैकी तिघांवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. अन्य दोघे बरे होऊन घरी परतले आहेत. 

मुलगा मुंबईत गेलेला 
वाड्यातील बाधित महिलेचा मुलगा 20 एप्रिल ते 5 मे दरम्यान मुंबई येथे आंबा वाहतूक करत होता. लक्षणे जाणवू लागल्यामुळे सध्या बाधित झालेली महिला, तिचा मुलगा व सून यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी मुलगा व सून यांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधित महिलेला ट्रॅव्हल हिस्ट्री नसली तरी तिच्या मुलाला आहे. त्यामुळे तिचा मुलगा व सून यांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविले आहेत.

3,176 व्यक्ती जिल्ह्यात दाखल
आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी सुमारे 400 पास मंजूर करण्यात आले आहेत. अशा पासच्या माध्यमातून सुमारे 1100 व्यक्ती जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. परराज्यातून वा अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तीन हजार 176 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. 

राज्याबाहेर जाणाऱ्यांमध्ये कनार्टकचे सर्वाधिक
राज्याबाहेर जाण्यासाठी 18 हजार 274 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. त्यापैकी 12 हजार 762 व्यक्तींची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्याचे संबंधित राज्य शासनाना कळविले आहे. परप्रांतीय व्यक्तींत सर्वाधिक 4 हजार 990 जण कर्नाटकातील आहेत. आंध्र प्रदेश - 74, बिहार - 594, छत्तिसगड - 20, दिल्ली - 2, गोवा 1069, गुजरात - 111, हरियाणा - 21, हिमाचल प्रदेश 2, जम्मू काश्‍मिर - 2, झारखंड - 492, केरळ - 89, मध्य प्रदेश - 807, मेघालय - 4, ओडिसा - 179, पंजाब - 3, राजस्थान - 784, तमिळनाडू - 26, तेलंगणा - 35, उत्तर प्रदेश - 2792, उत्तरांचल - 27, पश्‍चिम बंगाल - 628, दीव व दमण - 1.

loading image
go to top