
विधानसभेच्या निकालानंतर सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेचा जवळपास अस्त होत शिंदे शिवसेनेचा खऱ्या अर्थाने उदय झाला आहे. याचा थेट परिणाम पुढच्या जिल्ह्याच्या राजकारणावर दिसणार आहे. भविष्यात वर्चस्वाची खरी चुरस मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे शिवसेनेतच दिसण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यातील उरली सुरली संघटनाही टिकवणे आव्हानाचे ठरेल, अशी स्थिती आहे.