Sindhudurg Bank Recruitment Update
esakal
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमधील उमेदवारांची परीक्षा २८ फेब्रुवारीला जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची (Sindhudurg District Bank Clerk Recruitment 2026) आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती.