सिंधुदुर्ग जिल्ह्याची सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा 500 च्या खाली 

विनोद दळवी
Wednesday, 21 October 2020

जिल्ह्यात दिवसभरात 42 जणांनी कोरोनावर मात केली.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने 31 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 42 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 474 सक्रिय रुग्ण आहेत. मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 500 च्या खाली आली आहे. 
यातील 21 रुग्णांची तब्येत चिंताजनक आहे. 

जिल्ह्यात काल (ता. 20) 28 व्यक्ती बाधित आल्या होत्या. त्यामुळे एकूण बाधित संख्या चार हजार 609 झाली होती. आज दुपारपर्यंत आणखी 31 व्यक्ती बाधित आल्याने जिल्ह्याची बाधित संख्या चार हजार 680 झाली आहे. यातील तीन हजार 995 व्यक्ती मात करत घरी गेले आहेत. 121 रुग्णांचे निधन झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

सक्रिय रुग्णांपैकी 21 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात 18 ऑक्‍सिजनवर, तर तीन व्हेंटिलेटरवर आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 18 हजार 963 नमुने तपासण्यात आले. यातील तीन हजार 377 नमुने पॉझिटिव्ह आले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण 12 हजार 857 नमुने तपासले, पैकी एक हजार 373 नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत एकूण 31 हजार 820 नमुने संख्या झाली आहे. आज नव्याने 220 नमुने घेण्यात आले. सुदैवाने गेल्या 24 तासांत एकही मृत्यू नाही. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) 
देवगड 298 (8), दोडामार्ग 207 (2), कणकवली 1505 (30), कुडाळ 1042 (21), मालवण 384 (13), सावंतवाडी 611 (30), वैभववाडी 141 (7) , वेंगुर्ला 439, (9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 13 (1) तर तालुका निहाय सक्रिय रुग्णदेवगड - 18, दोडामार्ग - 23, कणकवली - 116, कुडाळ - 101, मालवण - 62, सावंतवाडी - 56, वैभववाडी - 7, वेंगुर्ले - 91.

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sindhudurg district, the number of corona patients is again below 500