सिंधुदुर्ग : कुडाळात कामगारांमध्ये हाणामारी; एक जखमी

पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत दगड घेऊन पाठलाग
हाणामारी
हाणामारीsakal
Updated on: 

कुडाळ: कुडाळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका इमारत बांधकामाच्या ठिकाणी परप्रांतीय कामगारांच्या दोन गटांत आज जोरदार मारामारी झाली. यात एक कामगार गंभीर जखमी झाला. दुसऱ्या कामगाराने तक्रार देण्यासाठी थेट पोलिस ठाणे गाठले; मात्र जखमी झालेला कामगार अन्य एका कामगारासह तक्रार देण्यासाठी गेलेल्या कामगाराला मारण्यासाठी हातात दगड, दांडे घेऊनच थेट पोलिस ठाण्यापर्यंत आला. या गटाला थोपविण्याच्या प्रयत्नात कामगार व पोलिसांमध्येही झटापट झाली. यातील एका कामगाराला रोखण्यात पोलिसांनाही अपयश येत होते. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. हा सारा प्रकार पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच घडत असल्याने तेथे बघ्यांची एकच गर्दी जमा झाली.

इमारत बांधकामावर एक परप्रांतीय कामगार पोओपीचे काम करीत होता. यावेळी तेथे एक कामगार हातात दांडके घेऊन फिरत होता. त्या कामगाराने दांडके घेऊन फिरणाऱ्या कामगाराला याबाबत विचारणा केली. त्याचा राग आल्याने त्याने दांडक्याने त्याला मारहाण केली. ही मारामारी तेथील अन्य कामगारांनी सोडवली. यानंतर जखमी कामगाराने पोलिस ठाणे गाठले. दुसरा कामगार व अन्य एक कामगार हातात दगड व दांडके घेऊन पोलिस ठाण्यापर्यंत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Sindhudurg Ganesh Visarjan
Vengurla Gold Jewellery Theft
Marathi News Esakal
www.esakal.com