यावर्षी ४ फेब्रुवारीपासून तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता तापमान ३७ अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहिले आहे.
वैभववाडीः सिंधुदुर्गात तापमानवाढीचा (Heat Wave in Sindhudurg) कहर दिवसागणिक वाढतच असून, सलग चार दिवस ३९ अंश सेल्सियस उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. आंबा, काजूचा दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मोहोर पूर्णतः करपला आहे. त्यामुळे दोन्ही पिकांवरील संकट अधिकच गडद झाले असून उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.