Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस, ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम

Northeast Monsoon: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. हिर्लोक परिसरात दुकाने, व्यवसाय आणि भातशेतीचे नुकसान झाले.
Heavy Rain in Sindhudurg Disrupts Paddy Harvesting and Blocks the Sawantwadi-Amboli Road

Heavy Rain in Sindhudurg Disrupts Paddy Harvesting and Blocks the Sawantwadi-Amboli Road

esakal

Updated on: 

वैभववाडी : जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्यांच्या बहुतांश भागांत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. पावसाचा आजचा सलग तिसरा दिवस आहे. काही शेतकऱ्यांनी पावसामुळे भातपीक कापणी थांबविली आहे. जिल्ह्यात ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम आहे. शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी जिल्ह्यातील वेंगुर्ले, कुडाळ आणि कणकवली तालुक्यांच्या काही भागाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. त्यानंतर आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com