

Health officials encourage
sakal
ओरोस : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील पात्र वयोगटातील मुलींना त्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी एच.पी.व्ही. लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी एच.पी.व्ही. लस अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.