सिंधुदुर्गमध्ये कोरोना सोबत आता भीती माकडतापाची; जिल्हाधिकाऱ्यांचे सतर्कतेचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurg ke manjulaxmi Collector Alert order

प्रतिबंध यंत्रणा सज्ज ठेवावी

सिंधुदुर्गमध्ये कोरोना सोबत आता भीती माकडतापाची; जिल्हाधिकाऱ्यांचे सतर्कतेचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस : जिल्ह्यामध्ये कोरोनाची साथ सुरू असून ती आटोक्‍यात असली तरीही आता माकडतापाची साथ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून माकडतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या केएफडी (माकडताप) समन्वय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जे. नलावडे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘जिल्हा रुग्णालयामध्ये मॉलिक्‍युलर लॅब तयार झाली आहे. माकडतापाच्या अनुषंगाने टेस्टिंगचे काम सुरू करण्यात यावे. त्यासाठी लागणारी अनुषंगिक उपकरणे व यंत्रणा सज्ज ठेवावी. साधनसामग्रीमध्ये काही उपकरणे कमी पडत असतील तर त्याचा प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे तातडीने पाठविण्यात यावा. या साधनसामग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल. माकडताप रुग्णांना लागणारी औषधे तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठीची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. औषधांचा साठा आरोग्य यंत्रणेकडे तयार असावा. औषधे खरेदी करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल.’’ 

 जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी माकड मृत अवस्थेमध्ये आढळल्यास व ते कोणाच्याही निदर्शनास आल्यास संबंधितांनी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. 
- के. मंजुलक्ष्मी

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top