Talathi caught accepting ₹5000 bribe in Maharashtra
esakal
कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी जितेंद्र काळू खेताडे (वय २८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने आज कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ सापळा रचून (Sindhudurg Anti-Corruption Bureau trap operation) पकडले. लाचेची रक्कम घेताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती विभागाने दिली.