आंबोली धबधब्यावरील बंधारे तोडण्यासाठी आठ दिवसाची मुदत - राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने तात्काळ काढून टाकावेत, अन्यथा ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही ते तोडून टाकू, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज दिला.

सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला.

येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने तात्काळ काढून टाकावेत, अन्यथा ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही ते तोडून टाकू, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज दिला.

आंबोली धबधब्याच्या वरील बाजूने वनविभागाच्याच्या वतीने सिमेंटचे बंधारे घालण्यात आले. त्यामुळे धबधबे म्हणावे तसे प्रवाहीत झाले नाहीत. याबाबत स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी हा प्रकार उघड केला होता. यावेळी काम चुकीचे झाल्यास ते बंधारे काढून टाकू, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले होते.

या पार्श्‍वभूमिवर तेली यांनी आज धबधब्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, प्रथमेश तेली, आत्माराम पालेकर, गजानन पालेकर आदी उपस्थित होते. यावेळी तेली यांनी परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता धबधब्याच्या वरच्या ठिकाणी वनविभाग सहा फूट उंचीचे बंधारे बांधले आहेत. त्यामुळे हा प्रकार निर्माण झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत धबधब्यावर पाणी कमी आहे त्याबाबत पर्यटकातून नाराजी व्यक्त होत आहे, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे पर्यटनावर होणारा परिणाम लक्षात घेता खुले करणे गरजेचे आहे, अशी मागणी केली.

याबाबत चुकीच्या पद्धतीने केवळ निधी खर्च करण्याच्या उद्देशाने हे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशीची मागणी आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करणार आहे

वनविभागाच्या हद्दीत सिमेंटचे पक्के बंधारे घातले आहेत. अशा प्रकारचे काम करता येत नाही. त्याठिकाणी बंधाऱ्यांसाठी खुदाई कशी काय झाली ? कामासाठी किती खर्च झाला ? याची माहिती मी मागणार आहे आणि चौकशी मागणी करणार आहे.
- राजन तेली,
माजी आमदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Rajan Teli Comment