मासे पकडण्यास गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

कुडाळ - चौकुळ मळईवाडी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. साई शंकर गावडे (वय 18, रा. गावडेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता.15) रात्री उशिरा घडली. 

कुडाळ - चौकुळ मळईवाडी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. साई शंकर गावडे (वय 18, रा. गावडेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता.15) रात्री उशिरा घडली. 

चौकुळ मळईवाडी येथील पापडी पूल येथे साई आपले वडील शंकर व चुलत भाऊ रूपेश गावडे, सोनू गावडे यांच्या सोबत काल सायंकाळी उशिरा मासे पकडण्यासाठी गेले होते. जाळे पसरविण्यासाठी साई हा पाण्यात उतरला. त्याठिकाणी काळोख असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यातच तो पाण्यात बुडाला. त्याची सर्वत्र शोधाशोध केली असता तो कुठेच सापडला नाही. 

याबाबत पोलिस पाटील प्रशांत गावडे यांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आंबोली पोलिस दूरक्षेत्रात माहिती दिली. रात्री उशिर झाल्याने पोलिसांनी शोध मोहिम थांबविली. आज सकाळी पुन्हा पाहणी केली असता साईचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती पाटकर यांनी मृतदेहाची पाहणी केली. 

साईच्या वडीलांचा कोल्हापूर येथे वडापावचा स्टॉल आहे. साईने कोल्हापूरच्या एस. एम. कॉलेज मध्ये बारावी कला शाखेची परीक्षा दिली होती. त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक तपास सहाय्यक उप निरीक्षक विश्‍वास सावंत, दत्तगुरु कलगोंडा करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News youngster dead