esakal | सिंधुदुर्ग पोलीस दलातील आणखी 26 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Police

सिंधुदुर्ग पोलीस दलातील आणखी 26 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग पोलीस दलातील (Sindhudurg Police Force) 29 पोलीस अधिकाऱ्यांच्या (Police Officer) बदल्यानंतर (Transfer) आणखी 26 पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केल्या आहेत. यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.

बदल्या झालेल्यांमध्ये सद्गुरु डिचोलकर यांची पोलीस मुख्यालयातून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ, सुधीर नाईक कणकवलीवरून सावंतवाडी, प्रदीप नाईक कुडाळ पोलिस ठाण्यावरून सिंधुदुर्गनगरी, प्रमोद गोलतकर आचर्‍यावरून पोलीस मुख्यालय, रवींद्र कदम यांची देवगडवरून पोलीस मुख्यालय, कृष्णा चापेकर कुडाळवरून पोलीस मुख्यालय, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उमा तेली यांची पोलीस मुख्यालयावरून नियंत्रण कक्ष, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर सावंजी जिल्हा विशेष शाखा, कृष्णा केसरकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शैलेंद्र कांबळे वैभववाडी, महिला पोलीस नाईक अनुराधा वागतकर सिंधुदुर्ग पोलीस ठाणे येथून जिल्हा वाहतूक शाखा, अमित राऊळ कुडाळ वरून सावंतवाडी, सुवर्णा कदम, रामदास जाधव यांची कुडाळ वरून दोडामार्ग, शैलेश सोंन्सुरकर सिंधुदुर्गनगरी वरून जिल्हा वाहतूक शाखा, लता कोळगे नियंत्रण कक्षा वरून सावंतवाडी, किरण कदम विजयदुर्ग वरून कणकवली, पोलिस ठाणे चालक प्रशांत जाधव व मृणालिनी सावंत यांची देवगड वरून विजयदुर्ग, पोलीस कॉन्स्टेबल हर्षवर्धन निर्मळे जिल्हा वाहतूक शाखेतुन जिल्हा विशेष शाखा, मंगेश साटम एटीसी वरून पोलीस मुख्यालय, गंगाबाई येडगे मालवण पोलिस ठाणे, सागर नांदगावकर कणकवली पोलिस ठाणे येथून जिल्हा वाहतूक शाखा, सुरज गव्हाणकर आचरा पोलीस ठाणे, संतोष डांबरे देवगड येथून विजयदुर्ग, गजानन देसाई सावंतवाडी वेंगुर्ले, अशाप्रकारे 26 जणाचा बदल्यांमध्ये समावेश आहे.

loading image
go to top