Sindhudurg Rain Update : 6 दिवसांनंतर पाऊस आला खरा, पण...; सिंधुदुर्गातील भात पिकावर मोठे संकट! हवामान विभागाचा 'हा' अंदाज चिंता वाढवणार
Sindhudurg rain update today : सिंधुदुर्गात सहा दिवसांनंतर झालेल्या हलक्या पावसामुळे भातशेतीला तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, पुनर्लागवडीसाठी आवश्यक मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात तब्बल सहा दिवसांनंतर आज पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे पुनर्लागवड केलेल्या भातरोपांना काही अंशी दिलासा मिळाला; मात्र शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षाच आहे.