esakal | अभिनंदनीय बाब! बायोगॅस सयंत्र उभारणीत `या` जिल्ह्याचा डंका
sakal

बोलून बातमी शोधा

 Sindhudurg ranks third in biogas construction

यावेळी 2019-20 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आंबा पिकाचा विमा हप्ता भरला, त्या सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई प्राप्त होणार आहे.

अभिनंदनीय बाब! बायोगॅस सयंत्र उभारणीत `या` जिल्ह्याचा डंका

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा तृतीय क्रमांक आला, अशी  माहिती आज झालेल्या कृषी समिती सभेत देण्यात आली. त्यामुळे सभेत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीची सर्वसाधारण मासिक सभा आज दुपारी 12 वाजता बॅ. नाथ पै. समिती सभागृहात समिती सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य सायली सावंत, सुधीर नकाशे, अमरसेन सावंत, प्रितेश राऊळ आणि समिती सचिव तथा कृषि विकास अधिकारी सुधीर चव्हाण उपस्थित होते. 

यावेळी 2019-20 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आंबा पिकाचा विमा हप्ता भरला, त्या सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई प्राप्त होणार आहे. काजू पिकाच्या भरपाई विमाची माहिती दोन दिवसात विमा कंपनीकडून उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी अरुण नातू यांनी दिली. जिल्ह्यात 39 महसुल मंडळ कार्यरत आहेत. त्या ठिकाणी स्वयंचलीत हवामान केंद्र स्थापन केली आहेत.

आता शासनाने नविन मान्यता दिलेल्या 18 महसुल मंडळामध्ये महसुल स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी नव्याने स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत, असेही श्री. नातू यांनी यावेळी सांगितले. 

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या फळ पिकांच्या नुकसानग्रस्त भागात फळपिकांची पुर्नलागवड करण्यासाठी शासनामार्फत विविध कलम रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरीता तालुका कृषि अधिकारी यांचे स्तरावरुन संबधित शेतकऱ्यांचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचना सभापती म्हापसेकर यांनी दिल्या.

मे 2020 मध्ये माणगाव खोऱ्यामध्ये जवळपास 40 गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची माहिती शासन स्तरावर सादर केली आहे. तरी त्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, असे सभापती यांनी सांगितले. यांत्रिकीकरणामध्ये पुरविण्यात येणाऱ्या औजारनिहाय परिपुर्ण माहिती पुढील सभेत सादर करण्याबाबत सुचना श्री. म्हापसेकर यांनी दिल्या. 

...तरच वाश्‍वासार्हता 
"मागेल त्याला शेततळी' या योजनेअंतर्गत सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे शेततळी खोदण्याबाबतचा लक्षांक यापुढे तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात यावा, अशा सभापती यांनी सुचना दिल्या. स्वयंचलित हवामान केंद्राच्या दिनांक निहाय व महसुल मंडळ निहाय नोंदीचा अहवाल जानेवारी 2021 पासून प्रत्येक कृषि समिती सभेत देण्यात यावा. जेणेकरुन हवामानाच्या होणाऱ्या नोंदीची विश्‍वासहर्ता वाढेल, असेही श्री. म्हापसेकर यांनी सांगितले. 

विविध सूचना 
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मातीचा भराव जाऊन भातशेतीचे नुकसान झाले आहे. तरी त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. जिल्हात अनेक ठिकाणी नदीपात्रात गाळ साचलेला आहे. त्यामुळे नदीचे पात्र वाढत आहे. तरी नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबतच्या सूचना केल्या. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top