Mother and Son Found Dead in Terekhol River in Sawantwadi
esakal
सावंतवाडी : सातार्डा-रायाचेपेड येथील मायलेकाने एकमेकांच्या हाताला दोरी बांधून तेरेखोल नदीपात्रात उडी घेत जीवन संपविले. हा प्रकार शनिवारी (ता. २४) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला. आज सकाळी नदीपात्राच्या काठावर दोघांचे चप्पल व बॅटरी आढळल्याने हा प्रकार उघडकीस आली. श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय ६३) व तुकाराम ऊर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय २७) अशी मृतांची नावे आहेत.