वैभववाडी - उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्ग जिल्हा होरपळला असून अंगाची लाही लाही होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. दुपारी बारा ते चार या वेळेतील उन्हांच्या झळा सहन करण्यापलीकडे वाढल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात अडीच ते तीन अंश सेल्शियसने वाढ झाल्याची दिसून येत आहे.