esakal | सिंधुदुर्ग : आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurg

सिंधुदुर्ग : आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : आरोग्य विभागाकडील कमी करण्यात आलेल्या २० आरोग्य सेविका (एएनएम) यांना तत्काळ पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले. या कर्मचाऱ्यानी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन केले. ही मागणी मान्य न झाल्यास गणेश चतुर्थी नंतर बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शासनाला दिला आहे.

२००५ पासून सुरू झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात ५९७ कर्मचारी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात आरोग्य सेवा देत आहेत. कमी मानधनात सुरू असलेली त्यांची सेवा कोरोना सारख्या महामारीतही अविरत सुरू होती. असे असतानाही केवळ कोरोना काळात आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रसुत्या झाल्या नसल्याचे तसेच मानधन देण्यासाठी केंद्राकडे निधी नसल्याचे सांगत जिल्ह्यातील २० आरोग्य सेविकांना आरोग्य सेवेतून कमी करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागात आरोग्य सेविकांनी आवश्यकता असल्याने त्यांना कमी न करता ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी त्यांची बदली करणे अपेक्षित होते. तसे न करता या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.

हेही वाचा: तुम्ही एमबीए करणार आहात? तर अशी करा 'एमबीए सीईटी'ची तयारी

याविरोधात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने आवाज उठविला असून या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. या कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यातील या अभियानातील सर्व कर्मचाऱ्यानी आज बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे. मात्र जिल्ह्यात. गणेशोत्सव असल्याने या कालावधीत गणेश भक्तांना सेवा देता यावी यासाठी आणि शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसाचे काम बंद आंदोलन या कर्मचाऱ्यांच्या वतीने छेडण्यात आले आहे. संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन केले आहे.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे ,जिल्हा सचिव सुवर्णा रावराणे, जिल्हा संपर्कप्रमुख अजित सावंत आदींसह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत

loading image
go to top