बांदा : लाखमोलाच्या जमिनी तेरेखोलमध्ये गडप

पावसाळ्यात नदी गिळंकृत करतेय काठ
तेरेखोल नदी
तेरेखोल नदीsakal

बांदा : यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला आलेल्या भरतीच्या उधाणामुळे आरोसबाग येथे नदी किनाऱ्यालगतची माड बागायत मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कोसळली आहे. यात लाखमोलाच्या सुपीक जमिनी तेरेखोलच्या उदरात गडप झाल्या आहेत. दरवर्षी सातत्याने कोसळणाऱ्या बागायतीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी तीव्रता वाढत जाणाऱ्या या संकटामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तेरेखोल नदीला बांदा, आरोसबागपर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी येते. बांदा रामनगर, आरोसबाग, मिळगुळी, लकरकोट येथे तेरेखोल नदीच्या उधाणामुळे कित्येक एकर क्षेत्रातील जमीन नदीपात्रात कोसळली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी मेहनतीने फुलविलेली बागायती देखील नदीपात्रात कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

तेरेखोल नदी
नाशिक : एक टन गोमांससह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

दरवर्षी हा प्रकार होत असल्याने बागायती व शेतजमीन वाचविण्यासाठी नदी किनाऱ्यालगत दगडी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांमधून होत आहे. बांदा, शेर्ले, कास, किनळे, कवठणी, सातार्डा येथे देखील तेरेखोल नदी किनाऱ्यालगत शेकडो एकर जमीन नदीपात्रात कोसळली आहे. पावसाळ्यात तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्यात कित्येक एकर बागायती पाण्याखाली जाते. यावर्षी पुराचा सर्वाधिक फटका बांदा शहर, शेर्ले, आरोसबाग गावांना बसला होता.

नऊ वर्षांपूर्वी तेरेखोल नदीकिनारी रामनगर याठिकाणी ३० मीटर लांबीची दगडी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात जमिनीची धूप थांबली होती. दरवर्षी याठिकाणी सुमारे ३० मीटर लांबीची भिंत बांधण्याचे आश्वासन मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आले होते; मात्र दुसऱ्याच वर्षी हे आश्वासन हवेत विरले. नदी किनाऱ्यालागतचे क्षेत्र ठिकठिकाणी कोसळल्याने आतापर्यंत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याठिकाणी दगडी भिंत मंजूर आहे; मात्र निधी नसल्याचे कारण देत अद्यापपर्यंत भिंतीचे काम हे सुरू करण्यात आले नाही. बांदा ते आरोसबागपर्यंत सुमारे एक किलोमीटर क्षेत्र या उधाणामुळे बाधित झाले आहे. माड बागायत मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कोसळली आहे. महसुल प्रशासनाने नुकसानीचा वेळोवेळी पंचनामा देखील केला आहे; मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याठिकाणी शासनाने वेळीच लक्ष देऊन संरक्षक भिंत बांधावी तसेच आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. नदी किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी बांधण्यात आलेल्या घाट पायऱ्यादेखील नदीच्या उधाणात पाण्यात कोसळल्या आहेत. यामुळे या पायऱ्या बांधण्यासाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.

वाळू उपशाचा फटका

तेरेखोल नदीपात्र सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर येते. यात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. याचा फटका किनारपट्टीवरील बागायतीच्या जमिनींना बसतो. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

तेरेखोल नदी
राज्याला अडचणीत आणण्यासाठी केंद्राकडून यंत्रणांचा वापर : रोहित पवार

भविष्यात पुलाला धोका

तेरेखोल नदीपात्रात बांदा-आरोसबाग येथे पूल बांधण्यात आला आहे. यासाठी नदीतीरावर पुलाचे खांब उभारण्यात आले आहेत. दरवर्षी दोन्ही बाजूकडील नदी किनाऱ्यावर माती कोसळण्याचा प्रकार होत असल्याने यामुळे भविष्यात पुलाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी तेरेखोल नदीच्या उधाणामुळे येथील बागायती जमीन नदीपात्रात कोसळत आहे. शासन केवळ नुकसानीच्या पंचनाम्यांचा दिखावा करत आहेत. प्रत्यक्षात अद्याप एक रुपयादेखील भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. याठिकाणी संरक्षक भिंत उभारल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. याचा शासनाने विचार करावा.

- संजय चांदेकर, शेतकरी, आरोसबाग

सद्यस्थिती अशी

दगडी भिंत मंजूर; पण निधी नाही

आरोसबागपर्यंत एक किलोमीटर क्षेत्र बाधित

घाट पायऱ्याही पात्रात कोसळल्या

शासनाचे लाखो रुपये पाण्यात

अनेक शेतकऱ्यांचे कष्ट गेले वाया

दरवर्षी प्रकार होत असल्याने संताप

पंचनामा झाला;

पण भरपाई नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com