कँटिनला लागली आग आणि बघता बघता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg Zilla Parishad  canteen fire kokan marathi news

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बंदावस्थेत असलेल्या कँटिनला आज सकाळी अचानक आग लागली.आणि...

कँटिनला लागली आग आणि बघता बघता...

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बंदावस्थेत असलेल्या कँटिनला आज सकाळी अचानक आग लागली. बघता बघता ही कँटिंग ची इमारत आगीच्या विळख्यात सापडली. जळणाऱ्या या इमारतीला लागुणच जिल्हा परीषदेची मुख्य इमारत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची इमारत आणि एक टपरी असल्याने या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचा काही काळा साठी ठोकाही चुकला. मात्र कर्मचारी आणि सफाईकामगार यांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तर कुडाळ एमआयडीसीच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने इमारतीच्या छपरावरील आग विझाविण्यात आली.

हेही वाचा- तुळसमध्ये गव्याच्या हत्येचे गुढ कायम, चार गोळ्या घालून हत्या -

अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण​

  जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माधोमध जिपच्या कँटिंग ची इमारत आहे. मात्र ही इमारत कित्येक वर्षे बंदावस्थेत आहेत. त्यामुळे या इमारती मध्ये जूने साहित्य ठेवण्यात आले आहे. तसेच गाड्यांचे जुने टायर त्यात ठेवण्यात आले आहेत. इमारतीला लागून सुके गवत असल्याने आणि या गवताला कोणीतरी आग लावल्याणे या ठिकाणी आग लागली असल्याचा अंदाज आहे. सुके गवत आणि झाडी यामुळे बघता बघता अगिने रौद्र रूप धारण केले. इमारतीमध्ये आसलेल्या साहित्यासह ही आग इमारती च्या छप्परापर्यंत पोहिचली. इमारतीच्या स्लैबवर कौलरु छप्पर असल्याने या छप्पराच्या वाशांनी पेट घेतला.

हेही वाचा- आमच्या मुलांच्या हातामध्ये भविष्यात करवंट्या.... कोण म्हणाले वाचा...

कित्येक वर्षे  इमारत बंदावस्थेत

ही आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच कर्मचारी आणि सफाई कामगार यांनी बादली च्या सहाय्याने पाणी मारुन जमिनिवारील आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले त्याला काही अंशी यश ही आले. मात्र छप्परावरील आगिने रौद्र रूप धारण केल्याने या आगीची कल्पना जिप सामान्य विभागाने जिल्हा आपत्ति व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर या कक्षाने यबाबतची कल्पना कुडाळ एमआयडीसी च्या अग्निशामक दलाला दिली. 12 च्या सुमारास अग्निशामक दल जिप भवनात दाखल झाला आणि जिप जुन्या कँटिंग च्या छप्परावरील आग बंबाने पाणी मारुन विझविण्यात आली.

टॅग्स :Sindhudurg