

Election officials prepare voter lists ahead of Zilla Parishad polls.
sakal
ओरोस : आगामी जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार निश्चित झाले आहेत. यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ४ हजार २४३ ने जास्त आहे. पूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास आठपैकी पाच तालुक्यांत महिला मतदार जास्त आहेत. देवगड, कुडाळ आणि दोडामार्ग तालुक्यांत पुरुष मतदारांचा वरचष्मा आहे.