राणेंच्या विश्‍वासाला साजेसे काम ः सावंत

sindhudurg zilla parishad president press conference
sindhudurg zilla parishad president press conference

सिंधुदुर्गनगरी -  खासदार नारायण राणे यांनी माझ्यावर दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. या विश्‍वासाला साजेसे असे काम पुढील वर्षभरात करणार असल्याचा विश्‍वास नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौ. सावंत बोलत होत्या. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते दत्ता सामंत उपस्थित होते. 
त्या म्हणाल्या, ""भाजप नेते खासदार राणे यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी सर्व सदस्यांच्या मदतीने लिलया पार पाडणार आहे. यापूर्वी ज्याप्रकारे सर्व जिल्हा परिषद सदस्यांना एकत्र घेऊन काम केले आहे, त्याच प्रकारे आताही असेच काम करणार आहे.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद व्हावी, असा आजचा दिवस आहे. कणकवली तालुक्‍यात पहिली जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मलाच मान मिळाला आहे. पाच वर्षाच्या टर्ममध्ये दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून मलाच संधी मिळाली आहे. त्याबद्दल खासदार राणे व आमदार राणे यांचे आभार मानते.'' यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, गटनेते रणजित देसाई उपस्थित होते. 

लढा देणारा शिल्लक राहिला नाही 
आमदार राणे म्हणाले, ""भाजपचे जिल्हा परिषद सदस्य हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे डुबत चाललेल्या शिवसेनेच्या जहाजात बसून आत्महत्या कोण करणार? त्यामुळे आमच्या सदस्यांवर नजर ठेवण्याची गरज पडली नाही. आम्ही सर्व एकसंघ आहोत. राणे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून सर्वजण निष्ठेने कार्यरत आहोत. हे आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून स्पष्ट झाले. यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल. सध्यस्थितीत शिवसेनेच्या गोटात चाललेली धुसपुस आणि शिवसेनेचे डुबत चाललेले जहाज पाहता या जिल्ह्यात आमच्याशी लढा देणारा कोण शिल्लक राहिलेला नाही.'' 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com