सीआरझेड ई सुनावणीस जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केला यासाठी विरोध

Sindhudurg ZP Officers Oppose To CRZ e Hearing
Sindhudurg ZP Officers Oppose To CRZ e Hearing

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव संपल्यानंतर सीआरझेड सुनावणी आमने-सामने लावण्यात यावी. 28 सप्टेंबरला लावलेली ई-सुनावणी रद्द करावी, अशी लेखी मागणी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात इंटरनेट नेटवर्कची दुर्दशा आहे.

अशावेळी 40 ते 50 हजार नागरिक या ई सुनावणीत सहभागी झाल्यास जिल्ह्याची यंत्रणाच कोलमडणार आहे. त्यामुळे ही ई सुनावणी रद्द करावी, अशी मागणी करतानाच 1991, 2011 आणि 2019 या तिन्ही वर्षातील सीआरझेड अधिसूचना व प्रारूप सागरी क्षेत्र व्यवस्थापन आराखडे मराठी अनुवाद करून देण्यासह सीआरझेड समन्वय समितीने केलेल्या मागण्या मान्य कराव्यात. त्याची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 पैकी 5 जिल्ह्याला सीआरझेडचा फटका बसत आहे. यासाठी पूर्वी 13 व 27 मार्चला सुनावणी आयोजित केली होती; मात्र यावेळी कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेवून या दोन्ही सुनावन्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 27 ऑगस्टला नोटीस काढत 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ई-सुनावणी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 5 तालुक्‍यांतील 200 पेक्षा जास्त ग्राम पंचायतमध्ये सीआरझेड क्षेत्र राखीव झाले असून 1 लाखापेक्षा जास्त कुटुंबातील 4 लाख 50 हजार पेक्षा जास्त नागरिकांना या कायद्याच्या जाचक नियमांचा सामना करावा लागणार आहे. परिणामी जिल्ह्यातील जनमाणसांवर याचा दूरगामी परिणाम होणार आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाने सीआरझेड आराखडा व धोरण याबाबतची जनजागृती तसेच प्रचार प्रसिद्धी केलेली नाही. हे अत्यंत धोकादायक आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com