Sindhudurg : नऊ दिवसांत ११ कोटी उलाढाल

‘उत्सव नवरात्रीचा, उत्सव महिला सक्षमीकरणाचा’
बचतगट
बचतगट sakal

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवानिमित्त ‘उत्सव नवरात्रीचा, उत्सव महिला सक्षमीकरणाचा’ या राबविलेल्या विशेष अभियानाअंतर्गत ९ दिवसांत तब्बल ३७३ बचतगट समूहांना ११ कोटी ९ लाख २७ हजार रुपये एवढे कर्ज वितरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांचे मोठे सहकार्य लाभले.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहांना विविध बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रासाठी ४ हजार ३९२ कोटी कोटींचे बँक पतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील १९०० कोटींचे कर्ज वितरण झाले. सप्टेंबर २०२२ अखेर उद्दिष्टांपैकी २ हजार २०० कोटींचे कर्ज वितरण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ३ हजार ४०० स्वयंसहाय्यता समूहांना ६५ कोटींचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून दिले आहे. जिल्ह्यात नवरात्रोत्सवापूर्वी १६३१ समूहांना ४५ कोटी ६७ लाख १३ हजार रुपये कर्ज वितरण केले होते.

जिल्ह्यात अजून १७६९ समूहांना १९ कोटी ३२ लाख ८७ हजार एवढे कर्ज वितरण शिल्लक राहिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नवरात्रोत्सवानिमित्त ‘उत्सव नवरात्रीचा, उत्सव महिला सक्षमीकरणाचा’ हे विशेष अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जाहीर केले होते. याची सुरुवात २६ सप्टेंबरला झाली होती. ४ ऑक्टोबरला समारोप झाला होता. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीतजास्त महिला समूहांना कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

जिल्ह्यातील बँकांनी मिळून मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण करण्याचे निश्चित केले होते. यासाठी सर्व बँकर्सची बैठक झाली होती. त्यामुळे कर्ज घेण्यास पात्र जिल्ह्यातील बचतगट महिला समूहांनी नवरात्रोत्सव कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा फायदा घ्यावा. या कालावधीत आपल्या बँकेत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी केले होते.

नऊ दिवसांत विशेष मोहीम

बँकांनी अभियान धर्तीवर प्राप्त प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नवरात्रोत्सवातील ९ दिवसांत विशेष मोहीम राबविली. त्यामुळे अवघ्या नऊ दिवसांत तब्बल ३७३ महिला बचतगट समूहांचे कर्ज प्रस्ताव मंजूर झाले. ११ कोटी ९ लाख २७ हजार रुपये एवढ्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. यात सर्वाधिक बँक ऑफ इंडियाने १०३ समूहांना तीन कोटी ६१ लाख ४५ हजार रुपये एवढे कर्ज दिले. बँक ऑफ महाराष्ट्रने ७० समूहांना एक कोटी ९१ लाख ५० हजार रुपये कर्ज दिले. एचडीएफसी बँकेने ३५ समूहांना एक कोटी ८ लाख दोन हजार रुपये तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४८ समूहांना एक कोटी ८ लाखाचे कर्ज वितरण केले.

...तर कुटुंबांना हातभार

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहांना विविध बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे अनेक महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या दिशेने हे एक पाऊल आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कर्ज मिळाल्याने महिला समुह बचत गट एखाद्या व्यवसायातून आपली प्रगती साधू शकतील. कर्त्या पुरुषासह संसाराचा गाडा चालवणारी महिलाही सक्षम झाल्यास अनेकांचे संसार नव्याने उभारी घेतील.

प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत जिल्ह्यातील सर्व बँकांनी चांगले सहकार्य लाभले आहे. ३७३ समूहांना ११ कोटी ९ लाख २७ हजार एवढे कर्ज वितरण झाले. या कालावधीत अजून सुमारे ३ कोटींचे कर्ज प्रस्ताव सादर केले होते; मात्र, बँकांना सलग सुटी आल्याने ते प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत. आता ते मंजूर होतील.

- वैभव पवार,जिल्हा कक्ष व्यवस्थापक, ‘उमेद’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com