esakal | Sindhudurga : ओटवणेत नव्याचा सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurga

Sindhudurga : ओटवणेत नव्याचा सोहळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओटवणे : सावंतवाडी राजकीय संस्थानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या ओटवणे गावाचा नव्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. दाण्यांनी भरलेल्या भाताच्या लोंब्यांच्या तोरणांनी घरे सजविण्यात आली.

ओटवणे गावऱ्हाटीतील पारंपरिक प्रथेनुसार नव्याची म्हणजे भाताची आज विधिवत पूजा करण्यात आली. ओटवणे गावाचे प्रमुख मानकरी रवींद्र गावकर यांच्या हस्ते ब्राह्मणांच्या मंत्रघोषात पूजा करून ओटवणे-मांडवफातरवाडी येथे ही प्रथा झाली. ढोल वाद्याच्या सवाद्य मिरवणुकीत कूळ घरापर्यंत वाजत गाजत यावेळी नव्याची आरास करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी नव्याच्या या पारंपरिक प्रथेत मानाची ठिकाणी ढोलाच्या वाद्याने दवंडी देत लोकांना या कार्यक्रमाची माहिती दिली जाते. ओटवणे गावाची ही पारंपरिक दवंडी २१व्या शतकातदेखील त्याच परंपरेने दिली जाते.

ग्रामस्थांना जागृत केले जाते. नव्याच्या या विधिवत पूजेवेळी गावातील प्रमुख मानकरी आणि शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथाच्या चरणी गाऱ्हाणे मांडण्यात आले.

loading image
go to top