कशामुळे आले आंबा, काजूचे अर्थकारण संकटात...?

 Sindudurg Mango, Cashew Economic Difficulty
Sindudurg Mango, Cashew Economic Difficulty

सावंतवाडी (सिंधूदूर्ग) : जिल्ह्यामध्ये यंदाचे बिघडलेले हवामान पाहता बागायतदार पुरते धास्तावले आहेत. थंडीचा अद्याप पत्ता नसल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका असलेल्या आंबा, काजू पिकाला अद्याप मोहरच आलेला नाही. यामुळे कृषी अर्थकारण पूर्णतः बिघडण्याची शक्‍यता आहे
यंदा मान्सून उशीरा दाखल झाला. त्यामुळे तो उशिरापर्यंत जिल्ह्यात सक्रिय राहिला.

मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच "क्‍यार' वादळाने वातावरणाचे गणित पालटले. या सर्व गर्तेत आता आंबा व काजू पिकाचे अर्थकारण संकटात सापडले आहे. खरीप हंगामावर निसर्गाने दाखवलेल्या कोपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागले. हिवाळी व उन्हाळी पिकवरही त्याचे दूरगामी परिणाम होणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सद्यस्थिती पाहता थंडीचा कालावधी पाऊस लांबल्यामुळे पुढे गेला. त्यामुळे मोहोर प्रक्रियाही उशिराने सुरू झाली.

हवामानातील बदलामुळे मोहर प्रक्रिया लांबणार

अखेरच्या काळातही  'सोबा' वादळामुळे वातावरण ढगाळ राहिल्याने आंबा व काजू पिकावर तुडतुडे, फुलकिडे यांचा धोका निर्माण झाला होता. बऱ्याच ठिकाणी अद्याप मोहोरच धरलेला नाही. यावेळी शेतकऱ्यांना आंबा , काजू पिकाची विशेष काळजी घ्यावी लागली. हवामानातील बदलामुळे वीस ते पंचवीस दिवस मोहर प्रक्रिया लांबणार असल्याची शक्‍यता यापूर्वीच वर्तविण्यात आली होती; मात्र तरीही मोहर पालवीचा बऱ्याच ठिकाणी पत्ताच नाही. त्यातच दुसरे संकट म्हणजे पुरेशी न मिळालेली थंडी म्हणजेच पुरेसे किमान तापमान न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलत नसल्याचे कृषी तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

"सोबा' वादळामुळे पिकावर परीणाम

किमान तापमानात गेल्या दोन-तीन दिवसापासून एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होत आहे. आंबा, काजू पिकाला मोहोर येण्यासाठी 18, 19 ते 20 अंश सेल्सिअस तापमान अधिक काळ रहाणे गरजेचे आहे. हे तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअसपर्यंत राहत आहे. त्यामुळे आंबा व काजू पिकाला अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास अडचणी ठरत आहे. गेल्या आठवड्यात 23 24 अंश सेल्सिअस तापमान राहिले आहे. अखेरच्या काळात "सोबा' वादळामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सरींचा शिडकाव झाला होता.

70 ते 80 टक्के मोहर कमी

तसेच संपूर्ण जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहिले होते. यामुळे एकीकडे थंडीने पाठ फिरवली असताना दुसरीकडे ढगाळ वातावरणापासून फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी बागायतदार कष्ट घेताना दिसून येत होता. यावेळी कृषी विभागाकडून दिलेल्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांची फवारणी व इतर उपाययोजना होत होत्या. सर्व साधारण काळ पाहता आंबा व काजू पिकाला 70 ते 80 टक्के मोहर आतापर्यंत येणे गरजेचे होते; मात्र ही प्रक्रिया बरेच मंदावलेली दिसून येत आहे. सद्यस्थिती पाहता देवगड भागात कातळ जमीन असल्याने आंबा पिकाला पुरेशी थंडी मिळत आहे.

हेही वाचा - धक्कादायक ! बापाचा खून करून मुलगा पोलिस ठाण्यात हजर 

भविष्यातील संकटांची चाहूल

इतर ठिकाणचा विचार करता सर्वसाधारण किमान तापमान अपेक्षा एक ते दोन दोन अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट होत आहे. हे सुद्धा बागायतदारांसाठी चिंताजनक बनले आहे. कृषी विद्यापीठाच्या मतानुसार 20 ते 25 दिवसांनी उशिरा आंबा-काजू मोहराला सुरुवात होईल; मात्र काही ठिकाणी हा काळ अधिकच वाढत असलेला जाणवत आहे. आताच्या परिस्थितीवरून बागायतदार भविष्यातील संकटांची चाहूल घेत आहेत. पिकाला मोहोर फुटण्याकडे बागेतदारांचे लक्ष लागून राहिले आहे

आंबा व काजूचे अर्थकारण पाहता कृषी विभागाकडून बागायतदारांना वेळोवेळी मार्गदर्शन व्हावे, आंबा, काजूपिक संरक्षण मिळावे, कीड रोगाचे योग्य नियंत्रण व्हावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. यंदाची स्थिती पाहता पीक संरक्षण व कीड-रोग नियंत्रण या दोन्ही बाबी आंबा-काजू बागायतदारांसाठी खूप महत्वाच्या भासल्या. याचा विचार करून कृषी विभागाने आतापर्यंत जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त ठिकाणी फळपिकांचे मार्गदर्शन केले आहे

पिक संरक्षण व कीड रोग नियंत्रण
उशिराच्या पावसामुळे यंदा थंडीही लांबवली आहे ; मात्र तरीही शेतकऱ्यांनी आपले अर्थकारण सांभाळण्यासाठी पिक संरक्षण व कीड रोग नियंत्रण याकडे लक्ष दिल्यास ते पुरेसे फळपीक घेण्यात फायदेशीर व उपयुक्त ठरू शकते
- सी. जी. बागल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग
आंबा व काजू पिकांना अनुकूल वातावरण
वीस ते पंचवीस दिवस थंडीचा कालावधी पुढे गेल्याने पुरेसे किमान तापमान फळपिकांना मिळाले नाही ; मात्र गेल्या दोन दिवसापासून किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे आता पुढे आंबा व काजू पिकांना अनुकूल वातावरण मिळेल, अशी गडद शक्‍यता आहे
- डॉ. यशवंत मुठाळ, शास्त्रज्ञ, ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या, मुळ 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com