घरात एकटीच बडबडत राहते म्हणून केला आईचा खून; आरोपीस जन्मठेप 

Sindudurg Mother Murder Lifetime Punishment
Sindudurg Mother Murder Lifetime Punishment

ओरोस  (सिंधुदुर्ग)  : आईचा खून करणाऱ्यास आज जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनंत ऊर्फ महेश चंद्रकांत चव्हाण (वय 32 रा. आकेरी गावडेवाडी, ता. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी ही शिक्षा सुनाविली. सरकार पक्षातर्फे वकील संदेश तायशेट्टे यांनी काम पाहिले. 

याबाबत माहिती अशी :

आईला जेवण व्यवस्थित करता येत नाही. ती घरात एकटीच बडबडत राहते, याचा राग मनात ठेवून चव्हाणने 30 मार्च 2018 ला दुपारी साडेबाराच्या सुमारास घरात लाकडाने सौ. मनीषा चंद्रकांत चव्हाण (वय 60 रा. आकेरी गावडेवाडी) यांच्या डोक्‍यावर वार केले. नंतर पाळ कोयत्याने मानेवर वार करून ठार मारले होते.

मनीषा यांचे भाऊ बाबली पांडुरंग चव्हाण केशकर्तन दुकान बंद करून बहिणीच्या घराजवळील नळावर हात पाय धुवायला आले असता बहिणीच्या घरातून त्यांना आवाज आला. त्यामुळे त्यांनी घरात डोकावून पाहिले असता अनंत मनीषा यांच्या डोकीवर फळीच्या तुकड्याने वार करीत असल्याचे दिसून आले. या प्रकारात घाबरलेल्या बाबली चव्हाण यांनी शेजाऱ्यांना याची कल्पना दिली.

राग मनात ठेवून कृत्य

याबाबतची फिर्याद कुडाळ पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी अनंत विरोधात गुन्हा दाखल करून त्याला त्याच दिवशी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात चालली. एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. यातील प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथील वैद्यकीय अधिकारी अमित लवेकर आणि संजयकुमार कल्कुटकी यांच्याबरोबरच जिल्ह्यातील डॉ. स्मिता पंडित यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

डीएनए अहवालात सिध्द
 
आईला मारल्यानंतर अनंतच्या कपड्यांवर पडलेले रक्त आणि त्याच्या बोटाला झालेली जखम आदी बाबींचा डीएनए अहवाल तपासात महत्त्वाचा ठरला. कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एल. भोसले आणि उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी तपास केला. चव्हाणला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. 

हेही वाचा - या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHOTOS

मानसिक स्थितीत बिघाड नव्हता 
या खून प्रकरणानंतर तपासणीच्या वेळी कुडाळ तालुका न्यायालयाने मुलगा आईचा खरोखरच खून करू शकतो का, असा सवाल केला. याचा तपास व्हावा आणि खून त्याने कोणत्या मानसिक स्थितीतून केला, त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. त्यामुळे त्याने हे कृत्य केले का, याची तपासणी करण्यासाठी त्याला रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठविले होते; मात्र त्याच्या मानसिक स्थितीमध्ये कोणताही बिघाड नसल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला होता.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com