चहाचे पैसे देणार नाही, असे श्री. सपकाळ यांनी सांगताच तन्वीर शेख याने साथीदारांसह बेकायदा जमाव करून रुपेश बबन सपकाळ यांना दोरीने बांधून काठीने व ठोशांनी मारहाण केली.
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील झाराप झीरो पॉईंट (Zarap Zero Point) येथे चहा पिण्यास थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक (Tourist) झाराप झीरो पॉईंट येथे हॉटेलमध्ये चहा पिण्यास थांबले होते. चहाच्या कपात माशी पडल्याचे पर्यटकाने सांगताच त्याचे रूपांतर वादावादीत होऊन हॉटेल मालकासह अन्य ५-६ जणांनी पर्यटकाला दोरीने बांधून जोरदार मारहाण केली.