लांजा : तालुक्यातील झापडे येथील मिथिलेश देसाई यांच्या बागेत २८ एकर क्षेत्रांवर सुमारे ७० वेगवेगळ्या जातींचे फणस लागवड (Jackfruit Cultivation) केली आहे. या झाडांची पाने जर्मनीतील (Germany) एका कॅन्सर संशोधन (Cancer Research) करणाऱ्या कंपनीला पाठविली आहेत. आतापर्यंत सहा टन पाने जर्मनीला निर्यात केली आहेत. त्यावर संशोधन झाल्यास लांजाचे नाव देशाच्या नकाशावर येईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.