esakal | बनावट ग्राहक बनून या दुर्मिळ प्राण्याची तस्करी रोखली
sakal

बोलून बातमी शोधा

smuggling of pangolin and rare snake stopped by police officers with the plan in ratnagiri

ग्राहक बनून शहर पोलिसांना ही मोठी कारवाई केली. तालुक्‍यातील काजरघाटी धारेवर पोलिसांनी आठ जणांची टोळी पकडली

बनावट ग्राहक बनून या दुर्मिळ प्राण्याची तस्करी रोखली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : खवल्या मांजरासह मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. ग्राहक बनून शहर पोलिसांना ही मोठी कारवाई केली. तालुक्‍यातील काजरघाटी धारेवर पोलिसांनी आठ जणांची टोळी पकडली. त्यांच्याकडून जिवंत खवले मांजर व १ मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला.

हेही वाचा - माजी आमदार बजरंग देसाई यांच्या कुटुंबियांचा हा आहे लकी नंबर

रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून शहर पोलिस संशयितांच्या मागावर होते. त्यानुसार पोलिसांनी आज मोठी कारवाई करत ही टोळी गजाआड केली. ही कारवाई पोलिस निरिक्षक अनिल लाड यांच्‍या मार्गदर्शनाखाली झाली. घाटी परिसरातील काही जण या तस्करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली. पोलिसांना यातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर पोलिसच बनावट गिऱ्हाईक म्हणून गेले. खवले मांजरासह मांडूळ जातीच्या सापाची डील केली; मात्र हे डील किती रुपयाला झाली हे मात्र कळू शकले नाही. मोठे गिऱ्हाईक सापडल्याने टोळी खुशीत होती. ठिकाण निश्‍चित झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आज दुपारपासून पोलिसांनी काजर घाटी धारेवर सापळा लावला. तीन दुचाकीवरुन आठ संशयित जिवंत खवले मांजर व एक मांडूळ जातीचा साप घेऊन आले होते.

हेही वाचा -  आमदार आवाडेसाहेब राजकारण दूषित करू नका 

भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी काजर घाटी धारेवर थांबल्या आणि फिल्मी स्टाईल झटापट झाली. मात्र पोलिसांनी साऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या. खवले मांजर तस्करी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करतात. त्यामुळे खवल्या मांजराची खरेदी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करणारे रॅकेट रत्नागिरीत सक्रिय असल्याची माहितीदेखील यानिमित्त पुढे आली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image