snake in ATM one women seen this in ratnagiri
snake in ATM one women seen this in ratnagiri

बापरे! एटीएममधुन बाहेर आला चक्क नाग

Published on

कुडाळ (सिंधुदुर्ग) : पिंगुळी म्हापसेकर तिठ्यावरील एका बॅंकेच्या एटीएममधून चक्क नाग बाहेर पडला. ही घटना काल दुपारी घडली. पिंगुळी म्हापसेकर तिठ्यावरच्या बॅंकेत एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी एक महिला जात असता त्या महिलेला एटीएमच्या दारातून एक नाग जातीचा साप बाहेर पडताना दिसला. त्यांनी त्याची माहिती शेजारी असलेले साई वाळके यांना दिली. त्यांनी तत्काळ पिंगुळीचे कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्‍यू फोरम, सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल गावडे यांना दिली. 

ते काही क्षणात घटनास्थळी पोहचले. एटीएममधुन बाहेर पडलेला नाग जातीचा साप शेजारी असलेल्या दगडाखाली लपुन बसलेला होता. लगेचच त्याला सुरक्षित पकडले. यानंतर गावडे यांनी ग्राहकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी बॅंक मॅनेजरशी पंधरा मिनट चर्चा केली. लगेचच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बॅंकेचे अधिकारी, साई वाळके, कृष्णा मयेकर, गणपत सामंत, तुळशीदास पवार, संतोष मुंडये, शितल रेडीज, बाबली परब उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com