बापरे! अॅक्टिव्हाच्या डिक्कीत चक्क सापडला साप!

दिनेश पिसाट
बुधवार, 10 जुलै 2019

महाडमधील नांदगाव तालुक्यात एका घरासमोर पार्क केलेल्या अॅक्टिव्हाच्या डिक्कीत साप सापडल्याने खळबळ उडाली आहे.

महाड : महाडमधील नांदगाव तालुक्यात एका घरासमोर पार्क केलेल्या अॅक्टिव्हाच्या डिक्कीत साप सापडल्याने खळबळ उडाली आहे. या अॅक्टिव्हाच्या चालकाने सापाला घेऊन तब्बल 6 किमी प्रवास केला. 

6 किलोमीटर प्रवास करून आल्यावर त्यांना गाडी पार्क करताना गाडीच्या पेट्रोल टँकजवळ काही तरी हालताना दिसले असता त्यांनी जमलेल्या सहकाऱ्यांसोबत गाडीचे पेट्रोल पॅनल उघडून बघितले. तर त्यात धूळ नागीण प्रकारचा साप बसलेला आढळून आला.

हा साप दुर्मिळ आहे त्यांनी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने सर्प मित्र डॉ. राहुल वारांगे आणि रुपेश वनारसे यांनी तो साप बाहेर काढून त्याच्या नैसर्गिक आदिवसात सोडले. हा साप पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र आपली गाडी घरातून बाहेर नेण्यापूर्वी तपासून पहा आणि मगच प्रवास करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snake found in Activa at Mahad

टॅग्स