Snake Sightings Surge Snake Rescuers
sakal
पाली - वातावरणात सातत्याने बदल होत असून आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ग्रामीण भागात सध्या भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या बदलत्या वातावरणामुळे आणि शेतातील वावरामुळे तसेच वणव्यांमुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा वेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असले, तरी जिल्ह्यातील विविध भागांत कार्यरत असलेले सर्पमित्र या मुक्या जिवांना देवदूतासारखे धावून जात नवीन जीवनदान देत आहेत.