मंडणगड पंचायत समिती सभापतीपदी स्नेहल सकपाळ 

Snehal Sankpal As Mandangad Panchayat Samitti Sabhapati
Snehal Sankpal As Mandangad Panchayat Samitti Sabhapati

मंडणगड ( रत्नागिरी ) - मंडणगड पंचायत समिती सभापतीपदी सेनेच्या स्नेहल सकपाळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली. पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात ही निवड प्रक्रिया पिठासीन अधिकारी शरद पवार यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी दिघे उपस्थित होते. 

पंचायत समितीत चारपैकी तीन सदस्य शिवसेनेचे आहेत. तर एक राष्ट्रवादीचा सदस्य आहे. सभापतीपदी सेनेच्या सर्व सदस्यांना संधी मिळावी या भूमिकेने काही दिवसांपूर्वी तत्कालीन सभापती व उपसभापतीनी राजीनामे दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यात सेनेचे आदेश केणे, प्रणाली चिले, स्नेहल सकपाळ यांनी उपस्थित राहून प्रक्रियेत सहभाग नोंदवला. तर राष्ट्रवादीचे नितीन म्हामूणकर निवडी दरम्यान अनुपस्थित राहिले.

सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. यामुळे ही निवड बिनविरोध झाली. पुढील शेवटच्या सव्वा वर्षासाठी देव्हारे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या स्नेहल सकपाळ सभापतीपदी विराजमान झाल्या. तालुक्‍यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे पंचायत समिती आवारात गर्दी दिसून आली.

नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, संदेश चिले, भगवान घाडगे, शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदचे अर्थ आणि शिक्षण सभापती सुनिल मोरे, अण्णा कदम, प्रेरणा घोसाळकर, सुरेश दळवी, रामदास रेवाळे, हरिशचंद्र कोदेरे, दीपक मालुसरे, संजय शेडगे, राजेश भवणे, अमिता शिंदे, शहरप्रमुख विनोद जाधव, सिद्धेश देशपांडे उपस्थित होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com