
वैभववाडी : सोनाळी गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आज घेराओ घातला. कमी-अधिक दाबामुळे नादुरुस्त झालेल्या विद्युत उपकरणाची भरपाई कोण भरून देणार? असा प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.