कुडाळ ते कर्ली "एसपीं'चा एसटी प्रवास

SP Rajendra Dabhade Travel  Kudal To Karli by ST
SP Rajendra Dabhade Travel Kudal To Karli by ST

ओरोस ( सिंधुदुर्ग) - जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज सायंकाळी चक्क कुडाळ ते कर्ली या एसटीने प्रवास केला. जिल्ह्यातील नागरिक एसटीने प्रवास करताना मास्क लावतात की नाही ? कोरोना नियमांचे पाळत करतात की नाही ? याबाबतची तपासणी करण्यासाठी दाभाडे यांनी हा एसटी प्रवास केला; मात्र अधिक्षकांच्या या सरप्राईज एसटी प्रवासाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. 

कुडाळ कर्ली ही एसटी नेहमी दररोज सायंकाळी 6.15 वाजता कुडाळ डेपोतून कर्ली या गावी जाण्यास सुटते. कर्ली येथे ही एसटी वस्तीसाठी जाते. आज नेहमीप्रमाणे ही एसटी सुटण्याची वेळ झाल्यावर पोलिसांच्या वेशात मास्क लावलेल्या एका भारदस्त व्यक्तीने प्रवेश केला. प्रवाशांना नेमके काय लक्षात आले नाही. सर्वांना प्रथम वाटले पोलिस काहीतरी तपासणी करायला आले आहेत; मात्र त्यांनी प्रवाशी सिटवर बसून अन्य प्रवाशांप्रमाणे एसटी कधी सुटते याची वाट पाहण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना ओळखले. 

""आपण निवती पोलिस ठाण्यात तपासणीसाठी जात होतो. मार्चअखेर आल्याने पोलिस ठाण्याच्या तपासणी करण्याचे काम सुरू आहे. याचवेळी त्या दिशेने एसटी जात असल्याचे मला समजले. प्रत्येकाच्या आयुष्यात एसटीचे एक वेगळे महत्व आहे. त्यामुळे मी या एसटीने प्रवास करण्याचे ठरविले. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांत एक प्रकारे समन्वय राहिल, हा एक उद्देश होता. त्याच बरोबर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करताना जिल्ह्यातील नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करतात की नाही ? मास्क लावतात की नाही ? याची खातरजमा करण्यासाठी आपण आज सायंकाळी कुडाळ ते कर्ली या एसटीने प्रवास केला.'' 
- राजेंद्र दाभाडे, पोलिस अधीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com