
कुडाळ : पाटमध्ये आगीत घर खाक
कुडाळ: तालुक्यातील पाट-परबवाडा येथील प्रकाश वामन सावंत यांच्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली. ही आग घरात घुसल्याने घरातील धान्यासह कपडे, पैसे, लाकूडसामान आदी साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे सावंत कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या आगीत साहित्यासह सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
पाट-परबवाडा येथे प्रकाश सावंत यांनी तीन वर्षांपूर्वी घर बांधले होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात ही आग घरात घुसली. घरातील एका खोलीमध्ये धान्य, कपडे, पैसे, कपाट आदी साहित्य होते. हे सर्व साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
घटनास्थळी एमआयडीसी येथून फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्यामुळे सावंत कुटुंबीयांवर आर्थिक संकट
Web Title: Spade Destroy House Fire Pat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..