
चिपळूण (रत्नागिरी) : लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी एक विशेष विमान बुक करून त्यांना मायदेशी कोकणात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. कोकणातील तरुणांनी युनायटेड कोकण टीमच्या माध्यमातून हे धाडस करून सातासमुद्रापारही आपली भक्कम एकजुट दाखवून दिली.
मंगळवारी हे विमान दुबईतून मुंबईसाठी रवाना झाले. त्यामध्ये 130 कोकणी लोक आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 20 गरोदर महिलांचा देखील समावेश आहे. दुबई, सौदी अरेबियामध्ये कोकणी लोक मोठ्या संख्यने नोकरीवर आहेत. काहीजण सहकुटूंब आहेत. कोरोना महामारीने आखाती देशाला यावेळी जबरदस्त विळखा घातला आणि त्याठिकाणी देखील लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या. हजारो तरूण चार महिने रुममध्ये बसून आहेत. पर्यटन आणि व्हिजिट विजावर गेलेल्यांचे विजा संपल्याने त्यांचे अक्षरशः हाल झाले आहेत.
व्हाईस ऑफ कोकण या नावाने दुबईमध्ये कोकणी तरुणांचा एक ग्रुप आहे. युनायटेड कोकण टीम नावाने या ग्रुपचे उपक्रम चालतात. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी दुबईमध्ये असलेल्या अनेक कोकणी तरुणांना तसेच कुटुंबांना मदतीचा हात दिला होता. आता परदेशात अडकलेल्या कोकणी तरूणांना गावाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. केंद्र, महाराष्ट्र सरकार, दुबईतील भारतीय दूतावास आणि दुबई सरकार यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या. यासाठी खेडचे मुख्तार पालेकर, चिपळूणचे दिलावर दलवाई, खालिद मुकादम, सबिना शेख, नजीर शेख, जुनेद शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.