श्रींना 28 नैवेद्याच्या पानांची परंपरा `येथे` आजही कायम

 Special Ganesh Tradition Of Naik Family In Nerur Kandariwadi
Special Ganesh Tradition Of Naik Family In Nerur Kandariwadi
Updated on

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील नेरूर कांडरीवाडी येथील सात कुटुंबीय असणाऱ्या श्री. नाईक घराण्याचा श्री गणपती यावर्षी 54 व्या वर्षात दिमाखात वाटचाल करीत आहे. "एकच मूर्तिकार, एकच मूर्ती' ही या गणेशाची खास वैशिष्ट्ये आहेत. पहिल्या दिवशी 28 पानांचा नैवेद्य दाखविला जातो. कोरोना संकटामुळे यावर्षी चाकरमानी कमी प्रमाणात आल्याने दरवर्षी गर्दीने फुलून जाणाऱ्या या घराण्यात यावेळी गर्दीचे स्वरुप कमी होते. 

कोकणात मोठ्या प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. त्याची जागा आता छोट्या कुटुंब पद्धतीने घेतली आहे; मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहेत. काही घराण्यांमध्ये सात-आठ कुटुंबियांचा एकच गणपती असतो अशी प्रथा अजूनही कायमस्वरूपी टिकून राहिलेली आहे. या अनेक घराण्यामध्ये तालुक्‍यातील नेरूर कांडरीवाडी येथील नाईक कुटुंबीयांचा गणपती एकत्र असतो. यावर्षी या घराण्याच्या श्री गणेशाने 54 व्या वर्षाकडे वाटचाल केली असून सुवर्ण वर्षाकडून आता हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे.

नाईक कुटुंब मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त मुंबईला वास्तवाला असते. गणेश चतुर्थी कालावधीत आठ दिवस अगोदर हे सर्व कुटुंब आपल्या नेरूर घराकडे येतात. या कुटुंबियांने आपल्या श्री गणेशाचा सुवर्णमहोत्सवी वर्ष दिमाखात साजरा केला होता; मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट गेले सहा महिने सर्वत्र थैमान घालत आहे. मुंबईत तर अतिधोक्‍याची ठरत आहे.

हे सर्व चाकरमानी मुंबई येथेच असल्याने त्यांनी मे महिन्यासह आता गणेशोत्सवसाठी गावी येणे टाळले आहे. काही आले ते 14 दिवस होम क्‍वारंटाईन झाले. दरवर्षी हे घराणे येथील माणसे व मुंबईतील चाकरमान्यांच्या गर्दीने फुलून जात होते. या घराण्याची विशेष परंपरा म्हणजे श्रींची गणेशमूर्ती ही सुरुवातीपासूनच नेरूर मेस्त्रीवाडी येथील जेष्ठ मूर्तिकार दाजी मेस्त्री व विलास मेस्त्री घराण्याकडे असते. कित्येक वर्षांची परंपरा आजही टिकून आहे.

गेली 54 वर्षे गणेशाची मुर्ती एकाच प्रकारची असते. मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गणेशमूर्तीची खासियत आहे. नाईक घराण्यातील सात कुटुंबियांमध्ये चंद्रकांत नाईक, गोविंद नाईक, राघो नाईक, नरेंद्र नाईक, सुभाष नाईक, अनिल नाईक, सुनील नाईक, रमेश नाईक ही सात कुटुंबे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी गणेशोत्सव सोहळा दिमाखात साजरा करण्यासाठी कार्यरत झालेले दिसून येतात.

या कालावधीत या नाईक कुटुंबियाची सुमारे शंभरहून अधिक माणसे श्रींची मनोभावे सेवा पूजा-अर्चा योग्य प्रकारे करतात. या घराण्याचा गणपती अकरा दिवस असतो. विशेष म्हणजे गणपतीच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी सात कुटुंबीयांच्यावतीने प्रत्येकी चार नैवेद्याची पाने श्रींसमोर दाखविण्याची कित्येक वर्षाची परंपरा आजही टिकून आहे, असे "सकाळ'शी बोलताना चंद्रकांत नाईक (रा. मुंबई, मुलुंड) वासुदेव नाईक यांनी सांगितले. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Residents and devotees claim the temporary repair has increased the risk of accidents and made travel more difficult.
Pali Shocker: Residents Mistake Mentally Ill Man for Burglar, Police Save Him
The protest followed the alleged assault on Mahad Municipality Chief Officer Dhananjay Kolekar inside his office.
Rare glowing mushroom in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com