Womens day 2021 : झाडांची डॉक्‍टर बनण्याचा कीर्तीचा ध्यास, धामण झाडावर कोइम्बतूरला संशोधन

the special story of women's day in konkan working for doctor of tree
the special story of women's day in konkan working for doctor of tree

रत्नागिरी : कोंडअसुर्डेची (ता. संगमेश्‍वर) कन्या कीर्ती अमोल कापडीला झाडांची डॉक्‍टर बनण्याचा ध्यास आहे. तमिळनाडूतील कोइम्बतूर कृषी विद्यापीठांतर्गत फॉरेस्ट कॉलेज ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम श्रेणीतून पूर्ण करून तिने एक पाऊल पुढे टाकले आहे. देशातील सर्वोच्च संशोधन विद्यालयात शिक्षण घेणारी रत्नागिरी जिल्ह्यातील ती पहिली तरुणी आहे. याच विद्यापीठातून ती पीएच.डी. करणार आहे. धामण झाडापासून प्लायवूडनिर्मिती करता येते, यावर तिने संशोधन केले आहे. 

देशात वनशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन एकत्रित असलेल्या दोन कृषी विद्यापीठापैकी कोइम्बतूर एक आहे. महाराष्ट्रात दापोली आणि अकोला येथे वनशास्त्र अभ्यासक्रम आहेत; परंतु संशोधन होत नाही. कोइम्बतूर सर्वात जुने आणि नावाजलेले विद्यापीठ असून देशातील आयएएस झालेले उमेदवार याच विद्यापीठातून पुढे आले आहेत. त्यामुळे कोकणातील ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या कीर्तीने शिक्षणासाठी तामिळनाडू गाठणे कौतुकास्पद ठरले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वनशास्त्रातील पदव्युत्तर पदवीला तिला ८३.५० टक्‍के मिळाले. 

परिश्रमाचे फळ...!

कीर्तीचा ओढा लहानपणापासूनच कृषीकडेच होता. संगमेश्‍वरच्या पैसाफंड हायस्कूलमध्ये १२ वीपर्यंतचे तिचे शिक्षण झाले. दहावीला तिने ८८ टक्‍के गुण मिळवले. दापोली कोकण कृषी विद्यापीठात वनशास्त्र विभागातून २०१८ ला पदवी घेतली. बीएस्सी फॉरेस्ट्री ती ८०.९० टक्‍के गुण मिळवत उत्तीर्ण झाली. कोकणात पसरलेल्या जैवविविधतेवर संशोधन करण्याच्या इच्छेतून चांगल्या विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणाची तिची इच्छा होती. तमिळनाडू राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत होणारी प्रवेश परीक्षा कीर्तीने दिली. अथक परिश्रमाचे फळ मिळून तिला कोइम्बतूर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधील फॉरेस्ट कॉलेज ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील प्रवेश मार्ग खुला झाला. तिच्यातील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी तिच्या आई-वडिलांचेही पाठबळ आहे. वडील आंबा व्यावसायिक आणि ठेकेदार असून आई घरी लघुउद्योग करते.

"शिक्षणासाठी पालक बाहेर पाठवण्यास तयार असतात पण मुलींनी इच्छा बाळगली पाहिजे. मुलींनी टॉपच्या विद्यापीठातून शिक्षण घ्यावे. मी शिक्षण पूर्ण केले, आता वनशास्त्रातून पीएच.डी. करणार आहे. कोकणातील जैवविविधता जतनासाठी आणि जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे."

- कीर्ती कापडी, कोंडअसुर्डे

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com