कोकण
सत्कर्म योगे वय घालवावे यासाठी नरदेह
न्यायाने संत सर्वांना मार्गदर्शन करत असतात. आपल्या प्रपंचातील असा एकही भाग नाही ज्याबद्दल संतांनी मार्गदर्शन केले नाही. त्यातीलच काही मार्गदर्शनाचा आपण विचार करणार आहोत.
आपण सद्गुण संपत्तीचा विकास करण्याचा अभ्यास केला पाहिजे. माणूस बोलण्यावरून ओळखला जातो. माणसे जोडणे आणि तोडणे दोन्ही कर्म एका जीभेकडूनच घडतात. कबीरजींनी एका दोह्यामध्ये एक छान प्रसंग सांगितला आहे, एकदा दात आणि जीभेचे भांडण झाले. दात म्हणाले, बाई गं सांभाळून राहा. आम्ही ३२ आहोत. क्षणात तुकडे करू जीभ म्हणाली मी नाही. तुम्ही सांभाळून राहा. कुठेतरी अशी पचकेन की, ३२च्या ३२ बाहेर जाल म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी एका ओळीत बोलण्याची महती सांगताना म्हटले आहे. जगामध्ये जगमित्र। जीव्हेपाशी असे सूत्र। आपण जगमित्र होण्यासाठी कसे बोलावे, याबद्दलही संत मार्गदर्शन करतात.
धनंजय चितळे, चिपळूण

