परदेशी दौऱ्याची स्वप्न पाहणाऱ्या इंजिनियरची मैदानावर अखेर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samir kadam dead on ground in oras kokan marathi news

कॉलेजच्या ग्राउंडवर फुटबॉल खेळत असताना त्याला अचानक त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो मैदानानजिक असलेल्या बेंचवर येवून बसला आणि...

परदेशी दौऱ्याची स्वप्न पाहणाऱ्या इंजिनियरची मैदानावर अखेर...

 ओरोस (सिंधुदूर्ग) : अवघ्या सहा महिन्यावर येवून ठेपलेली इंजीनियरिंगची परीक्षा देवून नोकरिसाठी अमेरिकेला जाण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या समीर सत्यवान कदम (वय 20) याचा मृत्यु 10 फेब्रुवारी रोजी झाला. कॉलेजच्या ग्राउंडवर फुटबॉल खेळत असताना त्याला अचानक त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो मैदानानजिक असलेल्या बेंचवर येवून बसला. तिथेच त्याला जास्त त्रास होवून त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्नालयाचे कर्मचारी सत्यवान कदम यांचा तो मुलगा असून समीरच्या आकस्मिक निधनाने कदम कुटुंबांसह त्यांच्या कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 समीर हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होता. 10 फेब्रुवारी रोजी फुटबॉल खेळत असताना त्याला अचानक त्रास जाणवू लागला. तेथेच तो जमिनीवर कोसळला. त्यामुळे तो मैदानाबाहेर येवून बसला. येथे तो विश्रांती घेण्यासाठी झोपला असता तेथेच त्याला जास्त त्रास जाणवू लागला. यातच त्याचे निधन झाले.

हेही वाचा- कोकणात चार वर्षांच्या माकडाची दहशत....

उत्तम स्पोर्टमनची अखेर

    समीर हा प्रामाणिक व हुशार मुलगा होता. त्याने माध्यमिक शिक्षण ओरोस हायस्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर पणदूर जूनियर कॉलेजमध्ये त्याने विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली त्यानंतर तो गेली तीन वर्षे खेडमधील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तो उत्तम स्पोर्टमन होता. क्रिकेट आणि फुटबॉल हे त्याचे दोन गेम होते. तो अत्यंत गुणवान होता. घरची परिस्थिती पाहुन तो शिक्षण पूर्ण करीत होता. अशा मुलाला 20 वर्षे तळहाताच्या फोडा प्रमाणे सांभाळल्यानंतर त्याचे अचानक जाणे आई-वडिलांना दुःखाच्या खाईत लोटणारे ठरले आहे.

हेही वाचा- मुंडेचा आदेश आणि त्या वादग्रस्त गृहपालाची अखेर बदली....

अमेरिकेला जाण्याचे स्वप्न अधुरे

समीरच्या जाण्याच्या धसका त्याच्या आईने जास्त घेतला आहे. त्याचे वडील हे प्रामाणिक कर्मचारी म्हणून परिचित आहेत. त्यामुळे समीरचे निधन झाल्याचे समजताच कुपवडे या त्यांच्या गावी जिल्हा रुग्णालयातील बहुसंख्य अधिकारी-कर्मचारी समीरच्या अंत्यविधिला पोहोचले होते. स्पोर्टमनमुळे समीर सिंधुदूर्गनगरीत सुद्धा प्रसिद्ध होता. त्यामुळे समीरच्या जाण्याची हळहळ कुपवडे गावासह सिंधुदुर्गनगरीत व्यक्त होत आहे.तसेच अमेरिकेला जाण्याचे समीरचे स्वप्न अर्धवट राहिले असून त्यासाठी प्रोत्साहन व मदत करणाऱ्या आई-वडिलांची इच्छा सुद्धा अधूरी राहिली आहे. समीरला एक मोठी बहिण आहे. आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकी असा परिवार त्याच्या पश्चात आहे. उत्तम स्पोर्टमन असलेल्या समीर याचे निधन अशाप्रकारे होणे, हे कोणालाही न पटनारे असेच आहे.


 

Web Title: Sportman Samir Kadam Dead Ground Oras Kokan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sindhudurg