काही सुखद - कोरोनाचे संकट ओळखून यांनी मास्क विक्रीतून मिळवले 3 लाखांहून अधिक रुपये......

Sridevi Jugai Women Self Help Group More than Rs 3 lakh from mask sales lockdown positiv impact
Sridevi Jugai Women Self Help Group More than Rs 3 lakh from mask sales lockdown positiv impact

संगमेश्‍वर (रत्नागिरी) :  नेहमी काम करणारे हात शांत बसू देत नव्हते. लॉकडाउनच्या दरम्यान शांत न राहता कारभाटले येथील महिला बचतगटाने कोरोनाचे संकट ओळखून मास्कचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन, मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले. कारभाटले येथील श्रीदेवी जुगाई महिला बचतगटाने लॉकडाउन दरम्यान 16 हजार 820 मास्क तयार करीत मास्क विक्रीतून 3 लाख 2 हजार 760 एवढे उत्पन्न घेतले. 


शेती करीत असताना उरलेला वेळ व्यवसायाकडे देण्यासाठी कारभाटले येथील महिलांनी श्रीदेवी जुगाई बचतगटाची स्थापना केली. बचतगटांनी सर्व जबाबदारी अर्चना घोरपडे हिच्याकडे दिली आहे. दुकानांतून मास्कची कमतरता असल्याचे महिला बचतगटांच्या कानी आल्यावर त्यांनी मास्क तयार करण्याचे ठरविले व त्यासाठीचे लागणारे प्रशिक्षण घेतले.

लॉकडाउनचा फायदा; श्रीदेवी जुगाई महिला बचतगट ​

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गटविकास अधिकारी रेवडकर, तालुका अभियान व्यवस्थापक हिंदूराव गिरी, अभियान व्यवस्थापक दीपक कदम, युवराज राठोड, प्रभाग समन्वयक प्रदीप पाताडे, योगेश देशमुख, मयूरी गुरव यांचे सहकार्य घेत मास्क बनविण्यास सुरवात केली. या कामामध्ये श्रीदेवी जुगाई महिला बचतगटाच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष सुलोचना गुरव यांच्यासह महिलांचे सहकार्य लाभले. मागणी वाढल्याने महिलांनी दिवसरात्र काम सुरू केले. त्यामुळे काही दिवसांमध्ये 16 हजाराहून अधिक मास्क तयार झाले. त्याची विक्रीही झाली आहे. या विक्रीतून बचतगटाला 3 लाखांच्यावर उत्पन्न मिळाले. 

हेही वाचा-येथे होतेय पॉझिटिव्ह संख्येत दिलासादायी घट..... - ​

मास्कचे मोफत वितरण 
बचतगटांनी केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता कोरोना योद्‌ध्यातील पोलिस तसेच आरोग्य कर्मचारी यांना मास्क मोफत दिले. कारभाटले येथील श्रीदेवी बचतगटाने मास्क विक्रीतून केलेली कामगिरी इतर बचतगटांना नक्‍कीच मार्गदर्शकच आहे.  

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com