मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाट अपघातात 21 जखमी

खेडमध्ये अपघात; मृत्यूजंय दूतांचे मदतकार्य, कळंबणी रुग्णालयात उपचार
accident
accidentaccident
Updated on

खेड (रत्नागिरी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी घाटाच्या पायथ्याशी रविवारी (ता. २९) समोरासमोर झालेल्या धडकेत २१ जण जखमी झाले. हा अपघात दुपारी दीडच्या सुमारासा झाला. जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार

भिवंडी येथून रत्नागिरीत येणारी एसटी (एमएच-२०-बीएल-२४५९) कशेडी घाट उतरून खेडमध्ये येत असताना समोरून येणाऱ्या डंपरशी (एमएच-४३-वाय-६२९८) समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, बसमधून प्रवास करणाऱ्या २१ हून अधिक जणांना दुखापत झाली. बसच्या वाहक व चालकासह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्यापैकी आकाश दत्तात्रय पिंपळकर (वय ३१, खेड), श्रद्धा आकाश पिंपळकर (२४, खेड), शशिकांत यशवंत घोसाळकर (५४, कडवई, संगमेश्वर), राजेश बबन शिरसाट (३५, नाशिक), खुशाल अशोक सूर्यवंशी (३१, नाशिक), प्रशांत राजेंद्र गायकवाड (३८, भरणे), संगीता सीताराम दोनवडे (५५, दयाळ, खेड), सानिका रोहित कांबळे (१८, दयाळ), कमल दशरथ मोरे (४०, रा. करंजाडी), दशरथ मनोहर मोरे (४५, करंजाडी),

accident
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 'या' गाड्या रद्द; असे आहे वेळापत्रक

अनंत नारायण मेस्त्री (७५, संगमेश्वर), इंदिरा अनंत मेस्त्री (७०, संगमेश्वर), कल्पना सुरेश भिंगारे (५०, रत्नागिरी), शीतल राकेश वाडकर (२८, रत्नागिरी), अलका हेमंत कळमकर (५७, चिपळूण), सिया रवींद्र वाडे (५७, चिपळूण), नम्रता राजेंद्र पिंपळकर (५०, चिपळूण), प्रणय राजेंद्र निमकर (२५, चिपळूण), शुभांगी सिद्धार्थ साळवी (४६, चिपळूण), आखतरी झाकिर हुसेन सावंत (४७, दापोली), नितेश कृष्णा पांचाळ (३२, मुर्तवडे) यांना कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किरकोळ जखमींना प्रथमोपचार करून घरी पाठवण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. पोलिसांनी अपघाताची माहिती घेतली असून सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Summary

खेडमध्ये अपघात; मृत्यूजंय दूतांचे मदतकार्य, कळंबणी रुग्णालयात उपचार

जखमींना काढले बाहेर

दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या मदत ग्रुप आणि हायवे मृत्यूजंय दूत कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेने जखमींना कळंबणी रुग्णालयात उपचारासाठी नेले. घटनास्थळी पोहोचलेले विशाल कापडी, जमिल परकार, राजन खेडकर, राकेश जंगम यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी नेण्यासाठी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com