चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीला अपघात; 52 जण जखमी, विद्यार्थ्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

वाडा अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात जाऊन झालेल्या अपघातात 52 प्रवाशी जखमी झाले आहेत.

वाडा - वाडा अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात जाऊन झालेल्या अपघातात 52 प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले  असून उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रवाशात बहुसंख्य विद्यार्थी आहेत. 

मनवमी प्रसाद (50) सुमन प्रसाद (45) यांच्या हातापायाला फॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,वाडा आगाराची वाडा- पिवळी एम एच 14 बीटी 2331या क्रमांकाची आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बस पिवळीहून वाड्याकडे येत असताना होती. बसचा चालक अतिवेगाने गाडी चालवत होता.जांभुळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस थेट शेतात गेली. या अपघातात 52 प्रवाशांना दुखापती झाल्या असून त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Bus accident after the driver lost control